Share

‘ते आले, त्यांनी पाहिलं आणि जिंकलं !’

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. यावेळी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, राणेंचे दोन्ही सुपुत्र- निलेश राणे व आमदार नितेश राणे हे यावेळी मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी बोलताना भाजप नेत्यांनी नारायण राणेंचं चांगलंच कौतुक केलं आहे. तर, अमित शाहांनी देखील नारायण राणेंचं कौतुक केलं. अमित शाह यांनी उपस्थिती लावल्यामुळे या कार्यक्रमाकडे राज्यच लक्ष होतं. यावेळी सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला, नंतर देशातील कोरोना स्थितीमध्ये केंद्र सरकारने राबवलेल्या उपाययोजनांवर भाष्य केलं. तर, नारायण राणे यांचं कौतुक केल्यानंतर महाविकास आघाडी व शिवसेनेवर प्रहार देखील त्यांनी केला.

त्यांच्या या उपस्थितीनंतर आमदार नितेश राणे यांनी आभार मानले आहेत. ‘ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं ! लाइफटाईम मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी आल्याबद्दल धन्यवाद. येत्या काळात कोकणात भाजपचं नंबर एकच पक्ष करण्यासाठी तुमच्या शब्दांनी आम्हाला पुरेसं सामर्थ्य दिलं आहे.’ असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!