🕒 1 min read
उत्तराखंड : देवभूमी उत्तराखंडवर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती कोशली आहे. चमोली जिल्ह्यात ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्याची घटना घडली आहे. जोशीमठच्या रेणीतील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर कोसळला आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.
हिमकडा कोसळल्यानंतर चमोली जिल्ह्यात आलेल्या पुरात १००-१५० नागरिक वाहून जाऊन दगावल्याची शक्यता असल्याचं उत्तराखंडाचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी म्हटलंय. दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्र सरकारने एनडीआरएफ उत्तराखंड येथे पाठवली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दुर्घटनेचा आढावा घेतला आहे.
पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांना फोन करून घटनेची माहिती घेतली. तसेच उत्तराखंडमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही मोदींनी संवाद साधला. यावेळी मोदींनी रावत यांना केंद्राकडून आवश्यक ती मदत देण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
कशी घडली दुर्घटना ?
जोशीमठपासून 25 कि.मी. अंतरावर पांग गावात एक प्रचंड हिमनग कोसळला. त्यामुळे धौली नदीला पूर आला. यानंतर हिमस्खलन झाले आणि नदीच्या पुरामुळे ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले. काही पूलांचे देखील यामुळे नुकसाना झालं आहे. तर, धरणाचा बांध फुटल्याने नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली असून शेकडो लोक बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमित शहांच्या दौऱ्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल’
- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत १०० ते १५० नागरिक मृत्यू पावल्याची भीती
- ‘भाजपची सत्ता असती तर हिंदूंचा अपमान करणाऱ्या या टोळक्यांच्या मुसक्या आवळल्या असत्या’
- पोलीस दलातील ‘डॉन’ कालवश; दशकभर केली सेवा
- एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे बसले मांडीला मांडी लावून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
