🕒 1 min read
वाशिम:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७५ दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान, आज देशात परिस्थिती फार वाईट आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. कामगारांचे कायदे मोडून काढले जात आहेत. भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करून द्यायचा कट पंतप्रधानांनी रचला आहे, असा आरोप जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
शेतकरी आंदोलन सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले. चहूबाजूंनी जनतेला अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. परकीय लोक देशावर सत्ता गाजवत आहेत असा भास होतं आहे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- माधुरी-आमिर पुन्हा येणार एकत्र; दिल चित्रपटाचा लवकरच रिमेक
- पँथरची पुर्वीपेक्षाही आजची आवश्यकता जास्त- रमेश खंडागळे
- डिजिटल पेमेंट युजर्स साठी महत्वाचे ‘हे’ पेमेंट अॅप होतेय बंद !
- माधुरीच्या ‘धकधक’ गाण्यावर अंकिताचा हॉट डान्स; व्हिडीओ व्हायरल
- एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे बसले मांडीला मांडी लावून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
