🕒 1 min read
मुंबई:- एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.
दरम्यान, एल्गार परिषदेचे एक आयोजक माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी यापूर्वीच शरजीलच्या वक्तव्याबाबत माफी मागितली होती. ‘शरजील चांगलं बोलला पण त्याने ‘मनुवादी’ ऐवजी ‘हिंदू’ शब्द वापरला ही त्याची चूक झाली,’ असं कोळसे पाटील यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, आता ‘भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान’ या आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर न्या.कोळसे पाटील यांनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये शनिवारी संध्याकाळी एक निवेदन दिलं. यामध्ये त्यांनी म्हटलं की, ३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यानं दिलेलं भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांच्या संघ परिवाराकडून चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जात आहे. शरजीलला लक्ष्य करुन संघ परिवाराने पुन्हा एकदा आपला धार्मिक विद्वेषाचा आणि जातीयवादी चेहरा दाखवून दिला आहे. शरजीलवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आम्ही एल्गार परिषदेचे आयोजक शरजील उस्मानीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं कोळसे पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
कोळसे पाटील यांच्या विधानाचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘भामट्याला भामट्यांच्या टोळीचा पाठिंबा नसेल कसा? भाजपाची सत्ता असती तर हिंदूंचा अपमान करणाऱ्या या टोळक्याच्या मुसक्या आवळल्या असत्या. जनाबसेनेला हे झेपणार नाही’, असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.
भामट्याला भामट्यांच्या टोळीचा पाठिंबा नसेल कसा? भाजपाची सत्ता असती तर हिंदूंचा अपमान करणाऱ्या या टोळक्याच्या मुसक्या आवळल्या असत्या. जनाबसेनेला हे झेपणार नाही.
आम्ही शरजील सोबत आहोत; एल्गार परिषदेच्या आयोजकांचा पुनरुच्चारhttps://t.co/8aktXNScvehttps://t.co/LyqnPrquuQ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 7, 2021
महत्वाच्या बातम्या
- माधुरी-आमिर पुन्हा येणार एकत्र; दिल चित्रपटाचा लवकरच रिमेक
- पँथरची पुर्वीपेक्षाही आजची आवश्यकता जास्त- रमेश खंडागळे
- डिजिटल पेमेंट युजर्स साठी महत्वाचे ‘हे’ पेमेंट अॅप होतेय बंद !
- माधुरीच्या ‘धकधक’ गाण्यावर अंकिताचा हॉट डान्स; व्हिडीओ व्हायरल
- एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे बसले मांडीला मांडी लावून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
