🕒 1 min read
चेन्नई : कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. कोरोनाला पळवण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनांसाठी समाजातले दानशूर देखील पुढे आले त्यापैकी सर्वात महत्वाचं नाव म्हणजे उद्योगपती रतन टाटा. करोनाच्या लढाईत टाटा उद्योग समूहाकडून आत्तापर्यंतची सर्वांत मोठी मदत केली आहे. एक यशस्वी उद्योगपती बरोबरच मोठ्या मनाचा माणूस, अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच शुक्रवारी सोशल मीडियावर रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी होत होती. मोटिवेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारत रत्न देण्याची मागणी ट्विटवरून केली. त्यानंतर BharatRatnaForRatanTata हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला.
Ratan Tata believes today`s generation of entrepreneurs can take India to next level. We confer the country`s highest civilian award Bharat Ratna for @RNTata2000
Join us in our campaign #BharatRatnaForRatanTata #RequestByDrVivekBindra@PMOIndia @rashtrapatibhvn @narendramodi pic.twitter.com/U3Wr3aMxJh
— Dr. Vivek Bindra (@DrVivekBindra) February 5, 2021
— Ratan N. Tata (@RNTata2000) November 26, 2020
लोकांचे प्रेम पाहून भारावलेल्या रतन टाटा यांनी शनिवारी ट्विट करून सर्वांचे आभार मानले. त्यांनी लिहिलं की,”मला भारत रत्न पुरस्कार मिळावा यासाठी सोशल मीडियावरून तुम्ही दाखवलेल्या भावनांचा मी आदर करतो. पण, मी एक विनंती करू इच्छितो की ही मोहीम थांबवावी. मी स्वतःला भारतीय असल्याचे भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगती व समृद्धीसाठी मी माझे प्रयत्न व योगदान देत राहीन.”
रतन टाटा यांची दर्यादिली आणि दानत जगाला माहिती आहे. त्यामुळेच, रतन टाटा यांच्यावर कोट्यवधी भारतीय प्रेम करतात. त्याचप्रमाणे, टाटा हेही भारतावर आणि भारतीय नागरिकांवर प्रेम करतात. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची अगदी कुटुंबाप्रमाणे काळजी करतात. कोरोना कालावधीतही टाटा यांच्या या दानशूर स्वभावाचा देशावासीयांनी अनुभव घेतला आहे. त्यांच्या या दानशूरपणामुळे त्यांना भारत रत्न देण्यात यावा अशी मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे उशिरा मिळालेला विकास निधी; खर्चासाठी ३१ मार्चची मुदत
- ‘या मुद्द्यावर योग्य तोडगा काढणं सर्वांसाठी महत्त्वाचं झालं आहे,’ शेतकरी आंदोलनावर युनोचा सरकारला सल्ला !
- “सचिनला भारतरत्न देणं चुकीचं, हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान”
- “सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?”
- ट्वीटनंतर युवक कॉंग्रेसकडून सचिनच्या कटआऊटला काळे फासत निषेध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
