सातारा : मराठा आरक्षणासह कष्टकऱ्यांचा लढ्यासाठी सतत झगडणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते मराठा आरक्षणासह, कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या फाऊंडेशनचे आज उद्धाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटन समारंभाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत आता आमचा अंत पाहू नका असा सज्जड इशाराच राज्य सरकारला दिला आहे. आता आमचा अंत पाहू नका, दुसऱ्याचे काढून आम्हाला काहीही देऊ नका पण आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला द्या. लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही. अस उदयनराजे म्हणाले आहेत. तर इतरांना न्याय मग आमच्यावर अन्याय का ? असा सवाल करत उदयनराजे यांनी राज्य सरकारने कोर्टात ठाम भूमिका मांडावी असे आवाहन देखील राज्य सरकारला केले आहे.
यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. मराठा आरक्षणावर सरकारचं लक्ष नाही. कोर्टात यांचा वकील उपस्थित राहत नाही. हे सर्व जाणीपूर्वक केल्यासारखं वाटतंय. उद्या मराठा समजात उद्रेक झाला तर त्याला थांबवणार कोण? असा सवाल करतानाच मराठा आरक्षणाबाबतचे राजकारण थांबलच पाहिजे, असं उदयनराजे म्हणाले. सध्या राजकारण गजकरण झालं आहे. सरकारला कोणती भाषा कळते तेच कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून कष्टकरी, सामान्यांच्या अडचणी, माथाडी कामगार यांच्या अडचणींवर काम केले जाणार आहे. तसचे या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रामुख्याने कुठल्याही राजकारणाचा हस्तक्षेप न होऊ देता मराठा आरक्षणाचा लढासुद्दा या प्रखरपणे लढला जाणार आहे, अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली. उदयनराजे, आणि शिवेंद्रसिंहराजे फाऊंडेशन उद्धाटनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं देखील – शिवेंद्रराजे भोसले
- भाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी
- आता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले
- रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील
- चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले


