सातारा : मराठा आरक्षणासह कष्टकऱ्यांचा लढ्यासाठी सतत झगडणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते मराठा आरक्षणासह, कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या फाऊंडेशनचे आज उद्धाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटन समारंभाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रखडलेल्या मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा घणाघाती आरोप शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. तर राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आरक्षणासाठी लढणं गरजेचं असल्याच मत देखील यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी बोलून दाखवले. तर कुणी मान्य करा अथवा नका करू. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं, पण हे सरकार आरक्षणात खोडा घालतंय, अशी टीका छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आज केली.
अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून कष्टकरी, सामान्यांच्या अडचणी, माथाडी कामगार यांच्या अडचणींवर काम केले जाणार आहे. तसचे या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रामुख्याने कुठल्याही राजकारणाचा हस्तक्षेप न होऊ देता मराठा आरक्षणाचा लढासुद्दा या प्रखरपणे लढला जाणार आहे, अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे फाऊंडेशन उद्धाटनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- भाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी
- आता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले
- रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील
- चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले
- …तर तीव्र आंदोलन करू – मराठा क्रांती मोर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

