Share

काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा नाही; केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

सरकार आणि आंदोलकांमध्ये अनेक चर्चाही झाल्या परंतु, या चर्चेत काही तोडगा निघू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून या कायद्यांना स्थगिती देतानाच पाच सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीत कृषी कायद्यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

दरम्यान, 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी तर काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा निघत नसल्याचा दावा केला आहे. मात्र, ही अदृश्य शक्ती कोणती? हे सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.

26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय उत्सव आहे. आंदोलनासाठी 365 दिवस पडले आहेत. शेतकरी त्यांच्या रॅलीची ताकद कधीही दाखवू शकतात. त्यामुळे 26 जानेवारी रोजी त्यांनी रॅली काढणं योग्य नाही. शेतकऱ्यांनी इतर कुठल्या तरी दिवशी रॅलीचं आयोजन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला रॅलीचं आयोजन केलं तरी या आंदोलनात शिस्त पाळली जाईल, याची मला खात्री आहे, असा विश्वासही तोमर यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!