🕒 1 min read
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या पहाटेच्या शपथविधीचे सूत्रधार शरद पवार हेच होते, असं खळबळजनक विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मागील वर्षी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार स्थापन केलं होतं. अडीच दिवस टिकलेल्या या सरकारची सर्वत्र चर्चा झाली.
उपराजधानीतील तरुण उद्योजक, व्यावसायिकांच्या जनरेशन नेक्स्ट ‘एन्टरप्रेनर फोरम’ने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आयोजित केली होती. आधी ठरल्याप्रमाणे ही मुलाखत ‘ऑफ रेकॉर्ड’ होती. कुठेही प्रसारण होऊ नये व चर्चा होऊ नये, यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. त्यावेळी प्रत्यक्षात फेसबुक लाइव्ह सुरू होते. हे लक्षात येईपर्यंत फडणवीस यांनी शाब्दिक बाणांनी भेद साधला होता. सूचक संदेश व्हायरल झाला. कार्यक्रम लाइव्ह असल्याचे लक्षात आल्यानंतर लिंक डिलिट करण्यात आली असली तरी, याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आम्ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. खातेवाटप, जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित करण्यात आले होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात केला आहे. दरम्यान, भाजपनेते निलेश राणे यांनी याच मुद्यावरून महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
गद्दारी करून ठाकरे सरकार मध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही. हेराफेरी करणाऱ्यांना सुरुवातीला यश मिळतं पण त्यांचा अंत वाईट असतो. स्वतःला मोठे जाणते आणि आम्हाला सगळं कळतं असं समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही. https://t.co/UHoQKEKtSh
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 19, 2021
गद्दारी करून ठाकरे सरकार मध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही. हेराफेरी करणाऱ्यांना सुरुवातीला यश मिळतं पण त्यांचा अंत वाईट असतो. स्वतःला मोठे जाणते आणि आम्हाला सगळं कळतं असं समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही असं म्हणत राणे यांनी तोफ डागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे नंतर महाराष्ट्र; मुश्रीफांचा पाटलांना टोला
- असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !
- विमानतळाचे नाव होणार छत्रपती संभाजीराजे विमानतळ-अतुल सावे
- ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा महत्वपूर्ण निर्णय
- “गाव कारभाऱ्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा; जय-पराजय विसरुन ग्रामविकासासाठी एकत्र या!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
