🕒 1 min read
औरंगाबाद : सध्या नामांतराचा विषय फारच जोर धरत आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप, सेना यांच्यात नामांतराचा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्यातच आता शहरातील विमानतळाला छत्रपती संभाजी राजे विमानतळ असे नाव देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला असून, या विषयी भाजपच्या नेते मंडळींनी केंद्रीय मंत्रांची देखील भेट घेतल्याचे आ. अतुल सावे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले. त्याबरोबर थोरतांचाही चांगलाच समाचार घेतला.
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नामांतराच्या मुद्द्याला मनपाने वेगवेगळे फलक लावून राजकीयदृष्ट्या चांगलेच खत पाणी घातले. त्यामुळे हा विषय स्थानिक पातळीवरतून थेट राज्यांच्या मंत्र्यांपर्यंत पोहचला. शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने हा मुद्दा चांगलाच धरला. तर महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाने कडाडून विरोध केला. त्यावर थोरात यांनी सेना भाजप वर टीकास्त्र सोडले होते.
त्यावर आ. अतुल सावे यांनी शहरासोबत विमानतळाचे देखील नामांतर छत्रपती संभाजी राजे विमानतळ ठेवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केल्याची माहिती देत. शहरातील वरिष्ठ तसेच काही नेते मंडळीनी विमानतळाच्या नामांतरासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री यांनी भेट देखील घेऊन चर्चा केली आहे. यावर लवकरच कळणार असल्याचे सावे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार हेच पहाटेच्या सरकारचे सूत्रधार- देवेंद्र फडणवीस
- ‘महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे, चला हवा येऊ द्या !’, राऊतांचा भाजपला टोला
- महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला दिला कौल; राष्ट्रवादी होणार एक नंबरचा पक्ष – तपासे
- ‘८० टक्के ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडी विजयी; खोटे आकडे देऊन जनतेची दिशाभूल भाजपने करू नये’
- सोलापुरात सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य; ऋतुराजची अवघ्या 21व्या वर्षात ग्रामपंचायतीत एन्ट्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
