Share

शरद पवार हेच पहाटेच्या सरकारचे सूत्रधार- देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

नागपूर:- महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या पहाटेच्या शपथविधीचे सूत्रधार शरद पवार हेच होते, असं खळबळजनक विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मागील वर्षी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार स्थापन केलं होतं. अडीच दिवस टिकलेल्या या सरकारची सर्वत्र चर्चा झाली.

उपराजधानीतील तरुण उद्योजक, व्यावसायिकांच्या जनरेशन नेक्स्ट ‘एन्टरप्रेनर फोरम’ने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आयोजित केली होती. आधी ठरल्याप्रमाणे ही मुलाखत ‘ऑफ रेकॉर्ड’ होती. कुठेही प्रसारण होऊ नये व चर्चा होऊ नये, यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. त्यावेळी प्रत्यक्षात फेसबुक लाइव्ह सुरू होते. हे लक्षात येईपर्यंत फडणवीस यांनी शाब्दिक बाणांनी भेद साधला होता. सूचक संदेश व्हायरल झाला. कार्यक्रम लाइव्ह असल्याचे लक्षात आल्यानंतर लिंक डिलिट करण्यात आली असली तरी, याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आम्ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. खातेवाटप, जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित करण्यात आले होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!