Share

ईशान्य भारताच्या गावागावात रिपब्लिकन पक्षाची सदस्य मोहिम सुरू आहे – रामदास आठवले 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई   – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभरात मजबूत उभा करण्यासाठी रिपाइंची सदस्य नोंदणी देशभर सुरू आहे.ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढत असून माझा पक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष म्हणून मी रिपब्लिकन या घोषणेचे ईशान्य भारतात मोठया प्रमाणात स्वागत झाले आहे. ईशान्य भारताच्या गावागावात रिपब्लिकन पक्षाची सदस्य मोहिम सुरू असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

रामदास आठवले यांनी नुकताच आसाम आणि त्रिपुरा या राज्यांचा दौरा केला. भारत सरकार च्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या विविध योजना ईशान्य भारताच्या गावागावात आम्ही पोहोचविण्याचा निर्धार केला असून त्यासाठी ईशान्य भारताच्या सर्व राज्यांचा आपण दौरा करणार असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी संगितले.

त्रिपुराची राजधानी आगरताळा येथे त्रिपुराचे राज्यपाल महामहिम रमेश बैश यांची आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांची  रामदास आठवले यांनी भेट घेऊन त्रिपुरामधील विविध प्रश्नांवर चर्चा केली. अगरताळा येथे त्रिपुरा राज्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात  रिपाइं च्या सदस्य नोंदणीचा आढावा घेऊन पक्ष संघटना वाढविण्याचे मार्गदर्शन रामदास आठवले यांनी केले.

यावेळी त्यांनी दिलेल्या मी रिपब्लिकन च्या नाऱ्याचे कार्यकर्त्यांनी मोठया उत्साहात स्वागत केले. अगरताळा येथे सफाई कामगार मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.अगरताळा येथे भारत बांग्लादेश सीमेवर भेट देऊन रामदास आठवले यांनी सीमा सुरक्षा दलाच्या भारतीय जवनांशी हितगुज केले. तसेच त्रिपुरा दौऱ्यात रामदास आठवले यांच्या हस्ते आगरताळा येथील आय सी एफ ए आय या विश्वविद्यालयाच्या ग्रंथालयाचे उदघाटन आणि वृक्ष रोपण करण्यात आले. या दौऱ्यात रिपाइं चे ईशान्य भारताचे संपर्क प्रमुख प्रभारी विनोद निकाळजे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!