Share

अचंबित…स्मिथची दांडी उडवल्यानंतर जडेजाच ‘या’ माजी खेळाडूकडून कौतुक

Published On: 

🕒 1 min read

सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या रविंद्र जडेजाने पुन्हा एकदा त्याच्या टीकाकारांचं तोंड बंद केलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिजचा तिसरा कसोटी सामना चालू आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा केल्या.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्मिथ याने त्याच्या संयमी फलंदाजीचा नमुना दाखवला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्मिथने बचावात्मक फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. संघाने ९ विकेट्स गमवल्यानंतरही स्मिथ संघसहकारी जोश हेजलवुडसोबत मिळून संघाचा डाव पुढे नेत होता. अशात डावातील १०६वे षटक टाकण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आला.

बुमराहच्या षटकातील चौथ्या चेंडूवर स्मिथने शॉट मारला आणि त्याने एक धाव पूर्ण केली. त्यानंतर दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी तो वेगाने धावत होता. तेवढ्यात जडेजाने चेंडू पकडला आणि निशाना साधत जोराने चेंडू यष्टीच्या दिशेने फेकला. अशात स्मिथची दुसरी धाव काही अंतराने हुकली आणि तो धावबाद झाला.

जडेजाने डायरेक्ट हिट करून स्मिथला रन आऊट केल्यानंतर मांजरेकर यांनी ट्विट केलं. ‘अशक्य असं हे काम फक्त जडेजासारखा फिल्डरच करू शकतो. फक्च अचूकता नाही तर थ्रोचा वेगही स्मिथला रन आऊट करण्यासाठी महत्त्वाचा होता. सर्वोत्कृष्ट’, असं ट्विट मांजरेकर यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!