ऑस्ट्रेलिया : सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. सिडनीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त 55 ओव्हर्सचा खेळ झाला. पावसाच्या अडथळ्यानंतरही ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवशी चांगली बॅटिंग केली. खराब फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विस्फोटक फलंदाज स्टिव्ह स्मिथने या सामन्यात भारतीय गोलंदाजांची पुरती दैना उडवत दमदार पुनरागमन केले आहे.
सिडनी कसोटी सामन्यात स्टिव्ह स्मिथचे दमदार शतक, मार्नस लाबूशेनच्या 91 आणि विल पुकोवस्कीच्या 62 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 105.4 ओव्हरमध्ये त्रिशतकी धावसंख्या पार करत 338 धावांपर्यंत मजल मारली आणि पहिल्या डावात संघाची स्थिती भक्कम केली.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत स्मिथने २२६ चेंडूंचा सामना करत १३१ धावा केल्या. यात त्याच्या १६ चौकारांचा समावेश होता. हे स्मिथचे भारताविरुद्ध कसोटीत केलेले आठवे शतक होते, तर आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीतील तब्बल २७ वे शतक होते. यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत त्याने संयुक्तपणे अव्वल स्थान मिळवले आहे.
स्मिथबरोबर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या विक्रमाच्या यादीत संयुक्तपणे अव्वलस्थानी विराजमान आहे. त्यांच्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज डेविड वॉर्नर आणि केन विलियम्सन यांनी कसोटीत प्रत्येकी २४ शतके केली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री आणि वियाक मेटेंमध्ये झाली ‘या’ मुद्यांवर अत्यंत महत्वाची चर्चा
- पंतच्या खराब कामगिरीनंतर कोचने व्यक्त केली नाराजी
- भाजपला शिवसेनेचा जोरदार दणका; दोन मातब्बर नेते बांधणार शिवबंधन
- ‘सहज, सुव्यवस्थित आणि अखंडपणे सत्तेचं हस्तांतरण करणार’; हिंसाचारानंतर ट्रम्प नरमले
- औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
