Share

स्टिव्ह स्मिथची जबरदस्त फलंदाजी, ऑस्ट्रेलिया 338 रनवर ऑल आऊट

Published On: 

ऑस्ट्रेलिया : सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. सिडनीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त 55 ओव्हर्सचा खेळ झाला. पावसाच्या अडथळ्यानंतरही ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवशी चांगली बॅटिंग केली.

सिडनी कसोटी सामन्यात स्टिव्ह स्मिथचे दमदार शतक, मार्नस लाबूशेनच्या 91 आणि विल पुकोवस्कीच्या 62 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 105.4 ओव्हरमध्ये त्रिशतकी धावसंख्या पार करत 338 धावांपर्यंत मजल मारली आणि पहिल्या डावात संघाची स्थिती भक्कम केली.

सिडनी टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या कांगारू संघासाठी माजी कर्णधार स्मिथने सार्वधिक 131 धावांची खेळी केली. स्मिथने तब्बल 14 डावानंतर पहिले टेस्ट सामन्यात शतक झळकावले. स्मिथचे कसोटी कारकिर्दीतील 27वे तर भारताविरुद्ध 8वे टेस्ट शतक होते. आपल्या खेळीत 13 चौकार लगावले. याशिवाय, लाबूशेनचे 9 धावांनी शतक हुकले.

वेडने 13 धावा केल्या तर मिचेल स्टार्क 24 धावा करून परतला. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने संघासाठी सर्वाधिक 3 तर जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनी यांना प्रत्येकी 2, मोहम्मद सिराजला 1 विकेट मिळली. स्टीव्ह स्मिथने तीन वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये ठोकले टेस्ट शतक विराट कोहली, रिकी पॉन्टिंग यांची बरोबरी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!