🕒 1 min read
मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुलीला गुरुवारी (७ जानेवारी) हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. त्याला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता.
त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बीसीसीआयचा अध्यक्ष गांगुलीने हॉस्पिटलमधून घरी परताना म्हटले आहे की ‘मी डॉक्टरांचे आणि उपचारासाठी हॉस्पिटलचे आभार मानतो. मी ठिक आहे.’
West Bengal: BCCI President Sourav Ganguly discharged from Woodlands Hospital in Kolkata.
He says, "I thank the doctors at the hospital for the treatment. I am absolutely fine." pic.twitter.com/snnV96LjL9
— ANI (@ANI) January 7, 2021
दरम्यान, सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गुलीला उपचारांसाठी कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुलीला जीममध्ये वर्कआऊट करताना त्रास जाणवू लागला. यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचं निदान झालं.यानंतर सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली.
महत्वाच्या बातम्या
- बीड जिल्ह्यातील वाळू माफिया विरुद्ध कडक कारवाई करा – धनंजय मुंडे
- काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोणी कराव?, राऊत म्हणाले…
- बांधकाम प्रकल्पांना प्रिमियमच्या निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही : देवेंद्र फडणवीस
- अमेरिकन संसदेवरील हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया…
- सामान्य माणसांंसाठी घरांच्या किंमती कमी होणार का? आशिष शेलार यांचा सरकारला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
