🕒 1 min read
वॉशिंग्टन : कोरोना नंतर जगाचे लक्ष वेधले आहे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकडे यामध्ये निवडणुकांनंतर लागणाऱ्या निकालांमध्ये मतमोजणी सुरु असून राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत पराभव झाल्यानंतर त्यानंतर देखील डोनाल्ड ट्रम्प यांची आगपाखड सुरूच होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली हार आणि जो बायडन यांचा विजय अद्यापही पूर्णपणे स्वीकारलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा सपशेल पराभव झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी संसद भवन आणि व्हाइट हाऊसमध्ये तुफान राडा केला. यावेळी हॉलीवूडच्या एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल असे नाट्य अमेरिकन संसदेवर रंगले होते.
यावेळी जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘वॉशिंग्टन डीसीमध्ये दंगा आणि हिंसाचाराच्या बातम्या पाहून व्यथित झालो. व्यवस्थित आणि शांततेत सत्ता हस्तांतरण चालूच ठेवले पाहिजे. बेकायदेशीर मार्गाने लोकशाहीला काळिमा फसला जाऊ शकत नाही.’ अस ट्वीट करत त्यांनी यावेळी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
Distressed to see news about rioting and violence in Washington DC. Orderly and peaceful transfer of power must continue. The democratic process cannot be allowed to be subverted through unlawful protests.
— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2021
याच दरम्यान लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा निषेध आणि हिंसाचाराला दुजोरा मिळू नये यासाठी ट्रम्प यांचे ट्वीटर, फेसबुक तर इन्स्टाग्राम देखील ब्लॉक करण्यात आल आहे. भारतातून देखील या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- राम मंदिरासाठी निधी संकलन करण्यास भाजपा कार्यकर्ते राज्यात घरोघर जाणार- पाटील
- आर्थिक, प्रशासकीय मंजुरीसाठी आयुक्तांना दिलेले विशेष अधिकार रद्द करावेत -भाजप
- चारचाकी वाहनधारकांनी फास्टटॅग न बसविल्यास दंडात्मक कारवाई; परिवहन अधिकाऱ्यांचा इशारा
- जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न?- भातखळकर
- वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं कसोटी मालिकेत पदार्पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
