🕒 1 min read
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकश्यांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्रास देण्यासाठीच तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असं भाकीत त्यांनी व्यक्त केलं. पुढे ते म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांनी देशाचा इतिहास पाहिला पाहिजे. विरोधी पक्ष आज दुबळा वाटत असला तरी अचानाक फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतो आणि ताकद दाखवतो”.
“काँग्रेस हा सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. गावागावत पोहोचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीत पक्षाचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे. पंडित नेहरु, इंदिरा गांधी आणि इतरांनीही देशासाठी खूप मोठा त्याग केला आहे. त्या पक्षाचं अध्यक्षपद हे देशातील आणि राजकारणातील एक महत्वाचं पद आहे. अशा काँग्रेसच्या नियोजित अध्यक्षाला ते विरोधी पक्षाचे नेते आहेत म्हणून अपशब्द वापरुन बोलणं आपली संस्कृती नाही,” असा टोला राऊतांनी लगावला आहे.
काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाव्यतिरिक्त कोणीही नाही का जो पक्षाचं नेतृत्व करेल असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “हा प्रश्न आपण भाजपाबद्दल विचारला तर आजही नरेंद्र मोदीच नेते आहेत. पक्षात लोकशाही असल्याचं सांगत असले तरी ती कोणाच्या नावावर चालत आहे हे सर्वांना माहिती आहे”.
काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाव्यतिरिक्त कोणीही नाही का जो पक्षाचं नेतृत्व करेल असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “हा प्रश्न आपण भाजपाबद्दल विचारला तर आजही नरेंद्र मोदीच नेते आहेत. पक्षात लोकशाही असल्याचं सांगत असले तरी ती कोणाच्या नावावर चालत आहे हे सर्वांना माहिती आहे”.
पुढे त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाच्या नावाने पक्ष चालतो. प्रत्येक पक्षाचा एक चेहरा असतो. तो चेहरा म्हणजे घराणं नसतं. कुटुंबानेही पक्ष उभा करण्यासाठी खूप त्याग केलेला असतो. यामध्ये गांधी कुटुंबही आहे. जर लोकांना गांधी कुटुंबच नेतृत्व करु शकतं असं वाटत असेल तर तो पक्षाचा निर्णय आहे. त्यात आम्ही बोलण्याची गरज नाही”.
दरम्यान, “राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत” असा प्रचार करूनही गांधी अद्याप उभेच आहेत व मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे. “अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने खासदार राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आघाडी सरकारच्या नेत्यांनी आपल्या कृतीतून शेतकरी प्रेम दाखवावे – रावसाहेब दानवे
- वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं कसोटी मालिकेत पदार्पण
- आर्थिक, प्रशासकीय मंजुरीसाठी आयुक्तांना दिलेले विशेष अधिकार रद्द करावेत -भाजप
- जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न?- भातखळकर
- राम मंदिरासाठी निधी संकलन करण्यास भाजपा कार्यकर्ते राज्यात घरोघर जाणार- पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
