Share

प्रदेशाध्यक्षपदासाठी आता तरुणांना संधी द्यावी,आम्ही त्यांच्या मागे उभे राहू : बाळासाहेब थोरात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरली कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून मोदी सरकार २.o चं सरकार स्थापन केलं. यानंतर, भाजपला इतर राज्यात यश मिळत असताना महाराष्ट्रात मात्र सर्वात मोठा पक्ष बनून देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं होतं.

संधीचा फायदा घेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र येत सत्ता स्थापन केली. भिन्न विचारसरणी असलेल्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याआधी काँग्रेसने काहीशी मुत्सद्दी भूमिका घेतली होती. तर, गेल्या वर्षभरात सत्तेत असून देखील दुय्यम वागणुकीमुळे नाराजी उघड केली.

या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सद्या औरंगाबादच्या नामांतरावरून बाळासाहेब थोरात यांनी विरोधी भूमिका घेतल्याने शिवसेना व काँग्रेसमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. अशातच आता थोरात प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, आता याबाबत उलटसुलट चर्चा होऊ लागल्यावर थोरात यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पक्षाला आपल्यावर अधिक जबाबदारी असल्याचे वाटून पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरील जबाबदारी कमी करण्याचा निर्णय घेतल्यास पक्ष जो निर्णय घेईल आणि जी जबाबदारी माझ्यावर दिली जाईल, ती स्वीकारण्यास मी तयार असेन, असे थोरात यांनी सांगितले. तसेच प्रदेशाध्यक्षपदासाठी आता तरुणांना संधी द्यावी. नवे नेतृत्व समोर आणावे, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू, असेही थोरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!