मुंबई : शिवसेनेनं भाजपशी असलेली मैत्री तोडून वैचारिक भिन्नता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा संसार सुरु केला. महाविकस आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवून मोठा पक्ष बनलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. सद्या जुने मित्र असलेल्या शिवसेना व भाजपमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपच्या नेत्यांवर अत्यंत तिखट शब्दात टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. सामनातील टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी व सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्याकडे या आक्षेपार्ह भाषेसंदर्भात तक्रार केली होती.
या पत्रावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘राज्यातील विरोधी पक्षाला त्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. बहकलेला विरोधी पक्ष हा महाराष्ट्रातील चिंतनाचा विषय ठरला आहे, पण चिंतन करायचे कोणी? भारतीय जनता पक्षाच्या चिंतन व मंथन बैठका अधूनमधून होत असतात, पण एक महाचिंतन बैठक घेऊन सध्याच्या विरोधी पक्षाने विधायक कार्यात कसे गुंतवून घ्यावे, याबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.’ अशी जहरी टीका केली आहे.
‘देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत, पण ‘चायपेक्षा किटली गरम’ असे काही लोकांचे सुरू आहे. उठसूट फक्त विरोध, दुसरे काही नाही. ”मुंबईतील महाकाली गुंफा विकू देणार नाही, एक इंचही जागा बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही”, अशा विरोधी वक्तव्याच्या उकळ्या काही किटल्यांना फुटल्या आहेत.’ असा टोला भाजप नेत्यांना लागवतानाच फडणवीसांना देखील लक्ष्य करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- “जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी ही कोरोनावरील लस घ्यावी”
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन
- मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेला सुरुहोण्यापूर्वीच घरघर
- गृहमंत्री अमित शाहांची खिल्ली उडवली म्हणून कॉमेडियनला खेचले पोलीस ठाण्यात
- “चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे”, राऊतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
