Share

पंतप्रधानांचा सौरव गांगुलीला फोन, प्रकृतीबाबत केली विचारणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

यानंतर सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर सौरव गांगुलीची करोना चाचणीही करण्यात आली. त्या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे समजते. गांगुलीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह क्रिकेट आणि राजकारणातील अनेक दिग्गजांनी प्रार्थना केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारी गांगुलीला फोन केला आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. PTIनं दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदी यांनी गांगुली व त्याची पत्नी डोना यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी गांगुलीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!