Share

औरंगाबाद नामांतर : ‘…तेव्हा छत्रपतींच्या नावाने दुकानदारी करणारे बोलभांड कुठल्या बिळात लपतात ?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सध्या राज्यात शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. मनसे आणि भाजपने हा मुद्दा लावून धरला असून त्या माध्यमातून शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. जेव्हा प्रश्न छत्रपती शंभूराजांचा असतो, औरंगाबादच्या नामांतराचा असतो, तेव्हा छत्रपतींच्या नावाने दुकानदारी करणारे बोलभांड कुठल्या बिळात लपतात ते महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेला बरोबर ठाऊक आहे असं म्हणत सेनेवर तोफ डागली आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का, याचे उत्तर द्यावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!