🕒 1 min read
नाशिक:- राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. या लग्नसोहळ्यात महाविकास आघाडीतील मंत्रीदेखील उपस्थित असल्यानं या लग्नाची चांगलीच चर्चा होत आहे. तर, भाजपनं या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांसह अनेक शासकीय अधिकारी ही उपस्थित होते. नाशिक शहरातील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा झाला असून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पुरती पायमल्ली करण्यात आलीय. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्या फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
या लग्न सोहळ्यात कोरोना नियम पायदळी तुडवण्यात आल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पालकमंत्री जिल्ह्याचे प्रमुख असतात. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सरकारचे दोन नंबरचे प्रमुख आहेत, ज्यांनी कायद्याचे पालन करायचे असते तेच जर अशा प्रकारच्या लग्नाना उपस्थित राहून कायद्याची पायमल्ली करत असल्यास सामान्य माणसांनी कायद्याची अंमलबजावणी करताना कोणाचा आदर्श ठेवायचा, असा सवालही प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी ही कोरोनावरील लस घ्यावी”
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन
- मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेला सुरुहोण्यापूर्वीच घरघर
- गृहमंत्री अमित शाहांची खिल्ली उडवली म्हणून कॉमेडियनला खेचले पोलीस ठाण्यात
- “चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे”, राऊतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
