Share

कॉंग्रेसचा शिवसेनेला धक्का; शिवबंधन तोडत ‘या’ नेत्याने घेतला कॉंग्रेसचा झेंडा हाती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. स्थानिक पातळीवर सुद्धा तिन्ही पक्ष एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले. पण भिवंडीपाठोपाठ मीरा भाईंदरमध्ये फोडोफोडीचा प्रकार समोर आला आहे.

मीरा भाईंदरच्या काशीमिरा हायवे पट्ट्यातील शिवसेनेचे नेते मेंनेंजीस सातन यांनी शिवबंधन तोडले आहे.सातन यांनी काल महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला.TV9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

यावेळी सातन यांच्या शेकडो समर्थकांनीही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मीरा भाईंदर परिसरातील काशीमिरा भागात मेंनेंजीस सातन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत उपशाखाप्रमुख म्हणून काम पाहिले होते.पण अचानक सातन यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे

विशेष म्हणजे भाजप किंवा इतर पक्षातून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये इनकमिंग अपेक्षित असताना गेले काही दिवस महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष एकमेकांचे छोटे-मोठे नेते फोडताना दिसून येत आहेत. आता महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर अशा पक्षांतराकडे राजकीय वर्तुळात गांभीर्याने पाहिले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!