कराड : काँग्रेसच्या विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ असलेले माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर याचं आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
विलासराव उंडाळकर नेहमी पुरोगामी विचारांसाठी ओळखले जायचे. त्यांनी सलग 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं. 2004 च्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होता.सहकार मंत्री म्हणून त्यांनी दमदार काम केलं होतं.
विलासकाका पाटील उंडाळकर यांचा जन्म 15 जुलै 1938 रोजी झाला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण उंडाळे गावात झालं. तर माध्यमिक शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूलमधून पूर्ण केलं. यानंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतलं.
विलासकाका उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एकमेकांचे कट्टर विरोधक होते हे सगळ्यांच माहित होतं. पंरतु दोन महिन्यांपूर्वी दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचं देखील समोर आलं होतं.राजकीय जीवनात त्यांनी अनेक सहाकरी संस्था उभारल्या. त्यांच्या जाण्याने कराड, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
विलासकाका पाटील यांनी राज्याच्या सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) त्यांच्या कराड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी ही कोरोनावरील लस घ्यावी”
- “कसोटीपूर्वी भारतीय संघावर दबाव आणण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हे वाईट कृत्य”
- मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेला सुरुहोण्यापूर्वीच घरघर
- गृहमंत्री अमित शाहांची खिल्ली उडवली म्हणून कॉमेडियनला खेचले पोलीस ठाण्यात
- “चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे”, राऊतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
