🕒 1 min read
नवी दिल्ली:- कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आज (२ जानेवारी) कोरोना वॅक्सीनसाठी देशातील प्रत्येक राज्यात ‘ड्राय रन’ (सराव फेरी) घेण्यात येत आहे.
देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांनी त्यांना दिल्लीप्रमाणं देशातील सर्व राज्यात कोरोना लस मोफत देणार का? असा सवाल केला असता डॉ.हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना लस दिल्लीतच नाही तर सर्व देशात मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी कुठलंही शुल्क घेतलं जाणार नाही.
दरम्यान, कोरोनाची लस मोफत मिळणार की विकत मिळणार? याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं असतानाच केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोना लसीचं मोफत वितरण केलं जाणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. त्यामुळे देशभरातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बांधकाम विभागातील बिल घोटाळ्याची चौकशी न केल्यास न्यायालयात जाऊ-अतुल भातखळकर
- सोनू सूद उतरणार राजकारणाच्या मैदानात?
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- बॉलिवूड एंट्री अगोदरच रश्मिका मंदाना महागली; एका चित्रपटासाठी घेणार इतके मानधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
