🕒 1 min read
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपलं वर्चस्व गाजवल्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना आता बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या सौदर्याच्या जोरावर रश्मिकाने दाक्षिणात्य चित्रपट गाजवले होते. आता ती बॉलिवूडमध्ये देखील चाहत्यांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज झाली आहे.
रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूडमध्ये रश्मिका बीबी बीं सोबत पदार्पण करणार आहे. रश्मिकासाठी बॉलिवूडची हि ग्रँड एन्ट्री ठरणार आहे. बॉलीवूडमध्ये येताच रश्मिकाला बॉलिवूड शेहनशा सोबत काम करायला मिळणार आहे. परंतु रश्मिका बीबी बींन सोबत काम करणार याच्या चर्चा कमी पण तिच्या मानधनाच्या चर्चा जास्त रंगल्या आहेत.
पिंकव्हिलाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बिग बीं सोबत काम करण्यासाठी ती चांगलं मोठं मानधन स्वीकारणार असल्याचं समोर येत आहे. विकास बहल यांचा ‘डेडली’ हा आगामी चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात ती बिग बींसोबत झळकणार आहे. चित्रपटासाठी रश्मिकाने चक्क कोटींच्या घरात मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पण विकास बहल यांनी चित्रपटाबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
याशिवाय रश्मिकाचा ‘मिशन मजनू’ चित्रपटात देखील झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील असणार आहे. रश्मिका आणि सिद्धार्थ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समोर येत आहे. आता रश्मिकाची बॉलिवूड एंट्री किती हिट ठरणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- बांधकाम विभागातील बिल घोटाळ्याची चौकशी न केल्यास न्यायालयात जाऊ-अतुल भातखळकर
- सोनू सूद उतरणार राजकारणाच्या मैदानात?
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- म्हणून IPL मधून एक्सिट घेतली रैनाचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
