🕒 1 min read
मुंबई : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येणारी अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. कंगनाने तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचे सांगत मुंबई दिवाणी न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे. तसेच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला.
न्यायालयाने कंगनाने खार इथल्या तिच्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत पालिका हे बांधकाम तोडू शकते असा निकाल दिला होता. या निकालाला कंगनाने आव्हान देत पालिकेला कारवाई करण्यापासून थांबवण्याची मागणी केली होती. कंगनाची हीच मागणी मुंबईतील दिवाणी न्यायलयाने फेटाळली आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणींत वाढ झाली आहे.
वांद्रे येथील बेकायदा बांधकामानंतर कंगनाने खार येथील फ्लॅट मध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आले होते. हे बांधकाम वाचवण्यासाठी कंगनाने दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात सूट दाखल केली. मात्र न्यायाधीश एल एस चव्हाण यांनी कंगनाला दिलासा देण्यास नकार देत सूट फेटाळून लावले.
एवढेच नव्हे तर सहा आठवडय़ांत पालिकेच्या नोटीसीवर हायकोर्टाकडून स्थगिती आणली नाही तर पालिकेला कारवाईपासून कोणीही रोखू शकत नाही असे तिला बजावले होते. खार पश्चिम येथील ऑर्किड ब्रीज इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगनाचे तीन फ्लॅट असून हे तीनही फ्लॅट तिने एकत्र केले होते. 50 टक्क्यांपेक्षा अतिरिक्त बांधकाम तसेच मुख्य स्ट्रक्चर मध्ये फेरफार केल्याने पालिकेने कंगनाला 26 मार्च 2018 रोजी नोटीस बजावली होती.
दरम्यान,या याचिकेवर न्यायाधीश एल एस चव्हाण यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या वतीने बाजू मांडणाऱया वकिलांनी कोर्टाला सांगितले की कंगनाने पालिकेची परवानगी न घेता फ्लॅटमध्ये फेरफार केले आहेत. ओसी प्लॅन मध्ये बरेच बदल केल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत न्यायधीशांनी पालिकेचा दावा मान्य केला व कंगनाने दाखल केलेले सूट फेटाळून लावत या निकालाविरोधात हायकोर्टात दाद मागण्यासाठी तिला सहा आठवडय़ांची मुदत दिली होती.
महत्वाच्या बातम्या
- मी काय पुण्यातच असतो; अजित पवारांचा फडणवीसांना टोला
- भारत-युकेमधील विमानसेवा पुन्हा सुरु होणार; केंद्र सरकारचा निर्णय
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- ‘भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी आता चाळ कमिटीच्या निवडणुकीतही उतरावं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
