Share

नव्या कोरोनाची धास्ती; महाराष्ट्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध वाढवले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. तसेच, नव्या कोरोनाचा प्रसार राज्यात थांबावा यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

देशात जवळपास नव्या कोरोनाचे २० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, हवाई सेवा बंद होण्याआधी राज्यात देखील परदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. त्यामुळे त्यांची माहिती घेऊन चौकशी करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुरुवातीला ३१ मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर जूनपासून टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली होती.

राज्य सरकारने ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी पावले उचलले होते. या मिशन बिगिन अगेन ची नियमावली ३१ जानेवारी २०२१ मध्ये देखील कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नववर्षात देखील या नियमांचं पालन करावं लागणार आहे.

राज्य शासनानं याबाबत आदेशही जारी केले आहेत. कम्टेन्मेंट झोनमधील निर्बंध 31 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. तसेच आपत्कालीन सर्व नियमावली आधीच्या लागू राहतील, असं सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!