🕒 1 min read
मुंबई : 2020 मावळत आहे. मावळते वर्ष काहीच चांगले पेरून गेले नाही. त्यामुळे नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोकमधून जोरदार टोलेबाजी केली आहे.
देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे. करोना, लॉकडाउनमुळे ओढवलेलं आर्थिक संकट आणि दुसरीकडे सुरू असलेल्या राजकारणावर बोट ठेवत राऊत यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत,” अशी टीका राऊतांनी सामना रोखठोक मधून केली आहे.
सामान रोखठोक मधून राऊतांनी २०२० मधील बरेच मुद्दे समोर आणले “मावळत्या वर्षात देशाने जे आघात सहन केले त्यांत कोरोनाचा हल्ला मोठा. लाखो लोकांनी प्राण गमावले. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ‘संसद’ म्हणजे लोकशाहीचा आत्मा. तो आत्माच नष्ट झाला. शेतकऱ्यांचे आंदोलन ज्या तीन कृषी विधेयकांविरुद्ध सुरु आहे ती तीनही विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली गेली. आता त्या विधेयकांविरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे.”
“अयोध्येच्या राममंदिरासारखे भावनिक विषय उभे केले जातात, पण शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार सरकार करीत नाही. हिंदुस्थानात लोकशाही राजवट असल्याचे आपण मानतो, परंतु चार-पाच उद्योगपती, दोन – चार राजकारणी व्यक्ती आपल्या महत्त्वाकांक्षा, वैर, राग लोभ, अहंकार यांच्यासाठी देशाला कसे वेठीस धरतात याचे चित्र मावळत्या वर्षात दिसले. आजच्या सामनाच्या रोखठोकमधून राऊतांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यांना EWS घ्यायचे आहे त्यांनी ते घ्यावं, ज्यांना SEBC ची वाट पाहायची आहे त्यांनी वाट पाहावी’
- आता कोल्हापुरात ‘आमचं मोडलंय?’ सतेज पाटलांनी ठोकला ‘स्वबळा’चा शड्डू
- ‘अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, शरद पवारांनंतर त्यांना काय स्थान राहील ते विचारावं’
- खडसेंनी आता सीडी लावून दाखवावीच; चंद्रकांत पाटलांचं खुलं आव्हान
- ‘2020 मावळत आहे, मावळते वर्ष काहीच चांगले पेरून गेले नाही’, संजय राऊतांचा ‘रोकठोक’ अग्रलेख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
