Share

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक डोळ्यासमोर ठेवूनच जगतापांवर सोपविली पक्षाने मोठी जबाबदारी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीनं काल त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्यासोबत माजी आमदार चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी तर नसीम खान यांची प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

याशिवाय, माजी मंत्री सुरेश शेट्टी यांना जाहीरनामा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या विविध समित्यांवरील अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणाही काल करण्यात आली.

आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने मराठी चेहरा पुढे केल्याची चर्चा आहे. भाई जगताप हे अत्यंत आक्रमकपणे पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोचवतील अशी आशा वरिष्ठांना वाटत आहे.

भाजपाने आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मराठमोळ्या अतुल भातखळकरांकडे जबाबदारी दिली. त्यात आता काँग्रेसनेही भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करून मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न केलाय.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!