🕒 1 min read
शिर्डी : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग पहातायला मिळत आहे. जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर आता जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पुन्हा एकदा धक्का देण्याचे संकेत दिले. ‘ ‘पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना निर्माण व्हायला लागली आहे. मधल्या काळात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड आणि आज राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु’ असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकांआधी भाजपवासी झालेल्या आमदारांना साद घातली आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या या खुल्या ऑफरवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील खणखणीत उत्तर दिलं आहे. ‘अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर ८० तासांचं जे सरकार आलं होत, त्यात त्यांनी जे आमदार सोबत आणले होते ते त्यांना टिकवता आले असते’ असं म्हणत त्यांनी पवारांची खिल्ली उडवली आहे.
पुढे त्यांनी अजित पवारांचं कौतुक देखील केलं. ‘तुमचं अतिशय उत्तम चाललं आहे चालू द्या. कशाला उगाच आमच्या लोकांना अट्रॅक्ट करता. आम्ही देखील तस म्हणू शकतो. अजित दादा हे खूप चांगले नेते आहेत. मी त्यांना नेहमी आदर देतो कारण ते अतिशय कर्तृत्ववान आहेत. सकाळी ७ ला त्यांचा दिवस सुरु होतो. अशा माणसाने जर एखाद गंमत निर्माण होईल असं वक्तव्य केल्याने त्यांची प्रतिष्ठा राहत नाही’ असा सल्ला देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ खास कारणासाठी डिसले गुरुजी ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर दिसणार
- …तर जानेवारीमध्येच महाराष्ट्रात कोरोना लसीकरण सुरु करू : आरोग्यमंत्री राजेश टोपे
- रयतच्या बड्या अधिकाऱ्याचा पुण्यात राजीनामा; परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार थेट साताऱ्यात
- महाविकास आघाडीत तणाव वाढणार? काँग्रेस नेत्याने दिला स्वबळावर लढण्याचा नारा
- केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत कृषी कायद्यांच्या प्रतिचे केले तुकडे-तुकडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

