🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी लंका प्रीमियर लीग स्पर्धा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतला होता. लंका प्रीमियर लीगमध्ये तो गॉल ग्लॅडिएटर्स संघाचा कर्णधार आहे. एलपीएलमध्ये आतापर्यंत तो केवळ तीन सामने खेळला.
स्पर्धा अर्ध्यातच सोडण्याचं कारण आफ्रिदीने सांगितलं नव्हतं. वैयक्तिक कारणामुळे आपण लंका प्रिमीयर लीग सोडून जात आहोत, परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा खेळण्यासाठी येईन, अशी प्रतिक्रिया आफ्रिदीने दिली. आफ्रिदीची मुलगी आजारी असल्यामुळे तो लंका प्रिमीयर लीग सोडून पाकिस्तानला परतल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
त्यावरच शाहिद आफ्रिदी त्याच्या मुलीवरून पसरत असलेल्या अफवांमुळे चांगलाच भडकला आहे. माझी मुलगी आजारी असून हॉस्पिटलमध्ये असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं आफ्रिदी म्हणाला. पाकिस्तानी टीव्ही चॅनल जियो टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार आफ्रिदीने नाराजी जाहीर करत सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे आणि अशा खोट्या बातम्या पसरवू नयेत, असं सांगितलं आहे. तसंच माझी मुलगी आजारी नसल्याचंही आफ्रिदी म्हणाला आहे.
मागच्याच आठवड्यात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये आफ्रिदीची मुलगी हॉस्पिटल मध्ये होती तर आफ्रिदी तिच्या सोबत दिसत होता. यावरूनच या अफवांना चांगलाच जोर बसला होता. या अफवा पसरल्यानंतर आफ्रिदी काही दिवस गप्प होता. मागच्या आठवड्यात त्याने इन्स्टाग्रामवर मुलीसोबतचा एक फोटोही शेयर केला होता आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णबला दणका; रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक
- महाराष्ट्र शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला तर ‘तो’ दिवस दूर नाही -प्रफुल पटेल
- ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेने, संयमाने साजरा करु’
- महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत रामदास आठवलेंचा राज्यव्यापी दौरा सुरू
- उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन, भाजपचा चहापानावर बहिष्कार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
