🕒 1 min read
मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही न्यायालयात जाणार असून, हॉलिडे बेंच याप्रकरणी सुनावणी करण्याची शक्यता आहे.
या घोटाळ्याप्रकरणी विकास खानचंदानी यांची याआधी चौकशीही करण्यात आली होती. बनावट टीआरपी रँकिंग मिळवून त्याच्या आधारे जाहिराती मिळविण्यासाठी वृत्तवाहिन्याना मदत करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याबाबत रिपब्लिकनसह अन्य दोन लहान टीव्ही चॅनेलवरही गुन्हा दाखल केला आहे.
माध्यमांमध्ये टीआरपीला (TRP) अनन्यसाधारण महत्व आहे. काही माध्यमांनी एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग मॅन्युप्युलेट केल्याचं समोर आलं होतं. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली होती.दरम्यान,ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होतं. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा तसंच रिपब्लिक टीव्ही यांना वाढीव टीआरपीचा लाभ मिळालेला.
महत्वाच्या बातम्या
- ५० – ५५ वर्षे राज्यात काम करतोय,ही संधी जनतेनी मला दिलीय – शरद पवार
- महाराष्ट्र शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला तर ‘तो’ दिवस दूर नाही -प्रफुल पटेल
- ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेने, संयमाने साजरा करु’
- महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत रामदास आठवलेंचा राज्यव्यापी दौरा सुरू
- उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन, भाजपचा चहापानावर बहिष्कार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
