🕒 1 min read
नवी दिल्ली : गेले आठ महिने देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोकांना या रोगाचीलागण झाली तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या रोगावर ठोस औषध नसल्याने करण्यात आलेल्या ताळेबंदीमधून सावरत असतानाच दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे पुन्हा उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
अशातच एक सकारात्मक वृत्त समोर येत आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (SII) विकसित करण्यात येत असलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती खुद्द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला आज भेट देणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी हे शनिवारी दुपारी एक ते दोन या कालावधीत ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट देऊन हैदराबादला जाणार होते. मात्र, त्याऐवजी ते हैदराबादहून पुण्यात येणार असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे भेटीच्या वेळेत थोडा बदल होणार आहे.’
करोनाप्रतिबंधक लशीच्या आढाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी गुजरात आणि तेलंगणच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी हे पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला भेट देतील. त्याशिवाय ते अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट देतील. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी हे हैदराबादेतील भारत बायेटक कंपनीलाही भेट देतील, असे ट्वीट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमचं ठरलंय : ‘या’ महापालिका निवडणुकांमध्ये आघाडी नाही; राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास ठाम!
- ‘माझा सामना, माझी मुलाखत’; हिंदुत्व असेल तर ते दिसत का नाही? : मनसे
- आधी छोटे नेते म्हणाले आणि आता चंद्रकांतदादांनी केलं शरद पवारांचं तोंडभरून कौतुक
- महाराष्ट्राला ड्रायव्हर नको तर मुख्यमंत्री हवा आहे; राणेंची तोफ धडाडली
- मविआच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्याने ‘या’ नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

