Share

धनंजय मुंडेंनी फिरवला उभ्या कापसात नांगर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा:  उभ्या महाराष्ट्रातील कापूस शेतकरी बोंडआळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त आहे अशात शेतकऱ्यांचा सरकारच्या पंचनाम्यावर विश्वास राहिला नसून आज पवनारमध्ये एका शेतकऱ्याने सरकारच्या निषेधासाठी चक्क विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाच आपल्या बोंड आळीग्रस्त उभ्या कापूस पिकात ट्रॅक्टर (नांगर) फिरवायला लावला.

“मी ही शेतकऱ्याचा मुलगा आहे. उभ्या कापसात नांगर चालण्याचे काम दुःखद अंतकरणाने करावे लागले. हे चित्र बघून शेतकऱ्याचे काळीज करपत आहे. आता तरी देवेंद्र ‘फसवणीस’ सरकारने डोळे उघडावेत आणि कापसाला हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी. जो कापूस निघाला आहे त्याला ५०० रुपये बोनस द्यावा.” अशी मागणी यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

दरम्यान, हल्लबोल पदयात्रेच्या सातव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवनार येथे पोहोचले. पवनार येथील शेतकरी श्रीकांत तोटे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या कापूस शेतीचे पाहणी करण्याची विनंती केली. बोंड आळीमुळे हाती आलेले पिक वाया गेले. पण शासनाने तोटे यांच्यामागे वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला असल्यामुळे दुहेरी संकट उभे राहिले होते.जेवढा कापूस झालेला आहे तो घेऊन जा आणि त्यातून लाईट बिल वजा करा, असे तोटे यांचे म्हणणे होते. जर असे करता येणार नसेल तर सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतः या शेतावर नांगर चालवावा, अशी विनंती तोटे यांनी केली होती .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!