Share

आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार ‘देसीगर्ल’; ‘वी कॅन बी हिरोज’चा टीझर प्रदर्शित !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलीवूड मध्ये ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीने हॉलीवुड मधील चित्रपटांमध्ये देखील अभिनय करत देसी गर्ल ते ‘क्वांटिको गर्ल’ असा प्रवास करणारी अभिनेत्री ठरली आहे. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या पर्सनल लाइफमुळे. सध्या प्रियांकाच तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली असून ती लवकरच वी कॅन बी हिरोज या हॉलिवूडपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

प्रियांकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वी कॅन बी हिरोज या चित्रपटाची माहिती दिली असून सोबत टीझर शेअर केला आहे.विशेष म्हणजे या टीझरमधून प्रियांका पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमधून सुपरहिरो आणि एलियन यांच्यातील युद्ध दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे सगळे सुपरहिरो लहान मुलं आहेत.

“चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना फार मज्जा आली. दिग्दर्शक रॉबर्ट रॉड्रिग्ज आणि या लहान मुलांसोबत छान वेळ गेला. विशेष म्हणजे या मुलांच्या विरुद्ध भूमिका साकारण्याचा छान अनुभव मिळाला. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे”, असं कॅप्शन प्रियांकाने या टीझरला दिलं आहे.

https://twitter.com/priyankachopra/status/1329483245650526209?s=20

दरम्यान, प्रियांका ‘द व्हाइट टायगर’ या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. या चित्रपटात प्रियांका सोबत राजकूमार राव मुख्य भुमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तर हॉलिवूड मधील ‘मॅट्रिक्स 4’ आणि ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटांमध्ये प्रियांका दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!