मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी वरवरा राव सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. तर, त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्र तसेच राज्य सरकारकडे केली होती.
दरम्यान, वरवरा राव यांना बुधवारी रात्री उशिरा तळोजा तुरुंगातून नानावटीत हलवण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील दोन आठवडे त्यांच्यावर उपचार केले जातील.
दरम्यान, राव यांची ढासळती प्रकृती लक्षात घेता त्यांच्या कुटुंबीयांकडून जामीन देण्याची मागणी केली जात होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालाकडून अनेकदा ही विनंती फेटाळण्यात आली होती. आता, न्यायालयाने वरवरा राव यांना काहीसा दिलासा दिला आहे.
न्यायालयाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार वरवरा राव यांना 15 दिवसांसाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलेल. तसेच वरवरा राव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचीही सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपाबद्दलचे मुस्लीम धर्मियांचे गैरसमज दूर करण्याचे भाजपने केले प्रयत्न सुरु
- २०३० पासून मिळणार नाही पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या कार्स !
- मतदार यादीतील नाव, पत्ता दुरुस्ती करण्याची संधी मिळणार
- करोनाचा धोका पुन्हा वाढला; ‘या’ शहरात कर्फ्यू लागू
- जनतेच्या मनात उत्सुकता आहे की ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय आहे ? : सोमय्या

