Share

देशात लवकरच येणार ‘खाजगी रेल्वे’ ! 16 खासगी कंपन्यांकडून अर्ज दाखल…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: अनेकदा तोट्यात जात असलेल्या कंपन्यांचे सरकार कडून खाजगीकरण केले जाते. यामध्ये विमान कंपन्या, इंधन निर्मिती, त्याच बरोबर आता भारत सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाला यापूर्वीच परवानगी दिली आहे. या परवानगीनंतर अनेक कंपन्यांनी प्रवासी खासगी रेल्वे चालवण्यास उत्सुकता दाखवत आपले अर्ज सादर केले आहेत. रेल्वेच्या खासगीकरणामध्ये पहिल्या टप्प्यात 12 ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. या खासगी ट्रेन कोण चालवणार यासंदर्भात रेल्वेने अर्ज मागवले होते. याला प्रतिसाद देताना एकूण 16 खासगी कंपन्यांकडून 120 अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी करुन त्या कंपन्यांच्या नावांना अंतिम स्वरुप देण्यास सुरूवात झाली आहे.

भारतीय रेल्वेने गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार, खासगी ट्रेन चालवण्यासाठी कंपन्यांची निवड दोन टप्प्यात बिडिंग प्रक्रियेअंतर्गत पारदर्शी प्रकारे केली जाणार आहे. पहिला टप्पा Request For Qualification (RFQ) आहे आणि दुसरा टप्पा Request For Proposal (RFP) हा आहे. रेल्वेकडे ट्रेन चालवण्यासाठी एकूण 16 खासगी कंपन्यांकडून 120 अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 102 अर्ज पुढील टप्पा म्हणजे Request For Proposal (RFP) साठी योग्य ठरवण्यात आले आहेत. यामध्ये काही मोठ्या नावांचा समावेश आहे.

12 क्लस्टर्ससाठी RFQ ची यादी 1 जुलै 2020 रोजी जाहीर झाली आहे. खासगी ट्रेन चालवण्याच्या या प्रकल्पात 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. तर, RFP साठी 7 ऑक्टोबर 2020 रोजी अर्ज मागवण्यात आले होते. खासगी कंपन्यांकडून याला शानदार प्रतिसाद मिळालाय. व्यस्त मार्ग आणि प्रवासी संख्येमुळे दिल्ली आणि मुंबई क्लस्टरसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. मुंबई आणि दिल्ली क्लस्टरसाठी 19, चंदीगड आणि चेन्नई क्लस्टर्ससाठी 5, जयपुर आणि सिकंदराबाद क्लस्टर्ससाठी 9 , हावडा, बंगळुरू आणि पाटणा क्लस्टरसाठी 8-8 अर्ज पात्र ठरले आहेत.

यामध्ये 1. IRCTC 2. GMR Highways Ltd. 3. Gateway Rail Freight Ltd. 4. IRB Infrastructures Developers 5. Welspun Enterprise Ltd. याशिवाय ज्या कंपन्यांनी क्लस्टरसाठी अर्ज केला आहे त्यामध्ये Arvind Aviation, BHEL, Construcciones y Auxiliar de Ferrocarrriles, S.A, Malempati Power Private Ltd आणि Cube Highways and Infrastructure III Pvt Ltd यांचा समावेश आहे. तर यामध्ये खासगी ट्रेनचे 12 क्लस्टर्स असतील Cluster 1  मुंबई 1, Cluster 2 मुंबई 2, Cluster 3 दिल्ली 1, Cluster 4  दिल्ली 2, Cluster 5  चंडीगड, Cluster 6  हावडा, Cluster 7 पाटणा, Cluster 8  प्रयागराज, Cluster 9   सिकंदराबाद, Cluster 10  जयपूर, Cluster 11  चेन्नई, Cluster 12  बंगळुरू, या क्लस्टर्स चा समावेश असणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!