🕒 1 min read
पुणे : राज्य शासनाने वारकरी संप्रदायाच्या भावनांचा सन्मान करत कोणत्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भावाचा धोका न पत्करता योग्य ती खबरदारी घेऊन , उपाययोजना करुन यात्रेची परंपरा अखंडित ठेवावी व ती निर्विघ्नपणे पार पाडावी , अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कार्तिकी यात्रेसंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीची बैठक प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला वारकरी महामंडळाचे अध्यक्ष तथा श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर चे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ, अ.भा. वारकरी महामंडळाचे केंद्रीय धर्मसभा अध्यक्ष भाऊ महाराज फुरसुंगीकर, श्रीनिवृत्तीनाथ संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त संजयनाना महाराज धोंडगे, तिर्थक्षेत्र व देवस्थान विभागाचे समन्वयक राजेश महाराज देगलूरकर, पश्चिम महाराष्ट्र संयोजक संजय घुंडरे पाटील आदिंसह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत एकमताने झालेला निर्णय जाहीर करताना आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे की,कोरोनाच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे आणि शासन प्रशासनाची कोणतीही तयारी नसल्यामुळे आषाढी यात्रा रद्द करावी लागली. या निर्णयाचे आम्ही स्वागत केले होते. सर्व वारकरी मंडळींनी समजूतदारपणा दाखवत शासनाला सहकार्य केले होते. आता मात्र सर्व व्यवहार सुरळित झाले आहेत. अशावेळी कोणत्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत शेकडो वर्षांची कार्तिकी यात्रेची परंपरा देखील जपली जाईल असा समन्वयाचा मार्ग राज्य सरकारने काढायला हवा. याकरिता वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ-श्रेष्ठ महाराज मंडळी, फडकरी, मठाधिपती, संस्थानिक आदींनी काही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवले आहेत. राज्य सरकारने लवकरात लवकर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा व तो जाहीर करावा जेणेकरून शासनाच्या नियमांनुसार दिंड्यांना आपापले नियोजन करता येईल.
महत्वाच्या बातम्या
- जड वाहनांचा टोल १० टक्क्यांनी वाढला, हलक्या वाहनांवरील सूट कायम
- उद्धवजी ठाकरेंचा जमिनी घेण्याचा व्यवसाय आहे तो लपवण्याचा का प्रयन्त करतात? : किरीट सोमय्या
- राज्यभर धुरळा उडणार, नव्याने जाहीर होणार ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम
- राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार!
- खडसेंपाठोपाठ भाजपचा दिग्गज नेता कोरोनाच्या विळख्यात!


