🕒 1 min read
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहिली. तर सकाळपासूनच शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत होते. स्मृतीस्थळावर न जाता घरातून, कार्यालयातून बाळासाहेबांना मानवंदना देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होत. कोरोनाचे संकट लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी स्मृतीस्थळावर जाऊ नका असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
यावरच महाविकासआघाडीतील काँग्रेस पक्षाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर नसल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. काल बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन होता. मात्र, संपूर्ण दिवसभरात काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी संदेश किंवा साधे ट्विटही करण्यात आले नाही. काँग्रेस बाळासाहेब ठाकरे यांचीच दखल घेणार नसेल तर मग शिवसेनेकडे उरले तरी काय, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
Entire day has passed n not a single message or tweet from the congress leadership on the death anniversary of the late Balasaheb Thackeray!
If Balasaheb is not even acknowledged then what’s left with the Shiv Sena??— Nitesh Rane (@NiteshNRane) November 17, 2020
दरम्यान, मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. मराठी माणसाचं पाऊल पुढे नेण्याचं दुसरं स्वप्नही आम्ही पूर्ण करु, असं वचन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं.
महत्वाच्या बातम्या
- कॉंग्रेसमध्ये इनकमिंग सुरूच, धनगर समाजाचे नेते लहू शेवाळेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
- इंदिरा गांधी यांनी आणलेली हरितक्रांती नष्ट करणारे कायदे राज्यात लागू होऊ देणार नाही – बाळासाहेब थोरात
- बीपीसीएलच्या खाजगीकरणात अनेक कंपन्या शर्यतीत, रिलायन्स,अरामकोची मात्र माघार…
- भारताविरूद्ध अनवाणी पायांनी मैदानात उतरत ऑस्ट्रेलियन संघ देणार ‘हा’ खास संदेश !
- आदेशामध्ये सुधारणा केल्याने ईडीच्या संचालकांना मिळाली मुदतवाढ…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
