Share

बिहारमधील फडणवीसांच्या कामगिरीनंतर भाजपने राज्यातील नेत्यांकडे सोपवले ‘या’ राज्यांचे नेतृत्व

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नुकत्याच बिहारमध्ये मुख्यमंत्री पदासाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं असून अवघ्या १ स्थानाच्या फरकाने भाजप बिहारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला आहे. तर, भाजप-जेडीयू युतीला बहुमत मिळालं असून सत्तास्थापनेसाठी ते दावेदार बनले आहेत.

बिहार निवडणुकांची जबाबदारी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. त्यामुळे बिहारमधील विजया मागे देवेंद्र फडणवीसांचा देखील वाटा आहे. अशातच आता, बिहारमधील फडणवीसांच्या कामगिरीनंतर भाजप नेतृत्वाने राज्यातील नेत्यांकडे आणखी काही राज्याच्या नव्या जबाबदाऱ्या सोपवतं विश्वास दाखवला आहे.

भाजपकडून नुकतीच राज्यनिहाय प्रभारींची नवी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये विनोद तावडे यांच्याकडे हरियाणाचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे. तर मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर त्रिपुरात डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या सुनील देवधर यांची आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यासोबतच, नाराज असलेले ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला दणका देत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर इतर नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न आता भाजपकडून सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच, पंकजा मुंडे व विनोद तावडे यांच्या नाराजीचे चर्चे असतानाच त्यांच्या राजकीय पुनर्वसन रोग्या पद्धतीने करण्यासाठी भाजपने ही जबाबदारी सोपवल्याचं देखील बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!