Share

तिकडे ट्रम्प हरले मात्र इकडं मोदी जिंकलेच – रावसाहेब दानवे

Published On: 

औरंगाबाद : राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.

राज्यात कोरोना काळानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणूक असल्याने अधिक महत्व प्राप्त झाले आहे. तसेच, विधानपरिषदेतील संख्याबळ वाढवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. आज औरंगाबादमध्ये पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या शिरीष बोराळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी, भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित होते.

यानंतर, त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘अमेरिकेसारख्या महासत्ता देशाच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला मात्र बिहारमधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय झाला. म्हणजेच सर्वात शक्तिशाली नेतृत्व नरेंद्र मोदी यांचं आहे.’ यासह त्यांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीत देखील भाजपला विजयी करायचं आहे असं सांगत दानवेंनी मार्गदर्शन केलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!