Share

एका मराठी बाईचं कुंकू ज्याने पुसलं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न हे नेते करत आहेत – अनिल परब

Published On: 

मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णव गोस्वामींसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्याबेंचसमोर गोस्वामींच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

यानंतर, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला ही जोरदार चपराक असल्याचे सांगत जोरदार टीका केली.सोमय्या म्हणतात, ‘अर्णव गोस्वामी यांना जामीन मंजूर होणे म्हणजे अन्यायाविरोधात न्यायाचा विजय आहे. ज्या प्रकारे मुंबई पोलीस कमिशनर यांच्यापासून गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या सत्तेचा राक्षसी दुरुपयोग केला. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आज ठाकरे सरकारला चपराक लगावली आहे.’

तर, परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलं आहे. “किरीट सोमय्या हे अर्णव गोस्वामी यांना वाचवायला बघत आहेत. याचा अर्थ ते एखाद्या हत्याऱ्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत. एका मराठी बाईचं कुंकू ज्याने पुसलं, ज्यामुळे महिलेच्या पतीला जीवन संपवावं लागलं अशा माणसाला दिल्लीपासूनचे सर्व नेते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!