Share

नितीश कुमार यांनी भाजप आणि संघाला सोडून आमच्यासोबत यावे : कॉंग्रेस

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने 74 जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला 43 जागा मिळाल्याने आणि राजदने 75 जगांवर विजय संपादन केला, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या 19 जागा मिळाल्या.

दरम्यान, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला विरोधी बाकांवरच बसावं लागणार आहे. कारण भाजप, JDU आणि मित्रपक्षांच्या NDAला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे 70 जागा लढलेल्या काँग्रेसला अवघ्या १९ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे सत्तेपासून दूर राहावं लागत आहे.

मुख्यमंत्री पदाची शपथ नितीशकुमार घेतील असे भाजप आणि जदयुच्या वतीने सांगण्यात येत आहे. अशातच नितीश कुमार यांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ऑफर दिली आहे.नितीशजी, बिहार आपल्यासाठी छोटे झाले आहे. तुम्ही भारताच्या राजकारणात यावे. सर्व समाजवादी, धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवणारे लोकांचे एकमत करण्यासाठी मदत करावी. संघाची इंग्रजांद्वारे ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीला रुजू देऊ नका. विचार नक्की करा, असेही दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमारांना सांगितले आहे.

हीच महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रति श्रद्धांजली ठरेल. आपण त्यांच्याच वारसाातून जन्माला आलेले राजकारणी आहात. तिथे परत या. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, जनता पार्टी संघाच्या दुहेरी भूमिकेमुळेच फुटली होती. भाजपा, संघाला सोडा आणि देशाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा, असे आवाहन सिंह यांनी नितीश कुमार यांना केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!