Share

ठाकरे सरकार म्हणजे…नुस्त बोलबच्चन : निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातलं ठाकरे सरकार हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. यांच्याकडून प्रत्येक वेळी फक्त केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. हातचं पीक गेल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी. नुसतं बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा, अशी टीका त्यांनी केली आहे.

तसेच राणे यांनी शिवसेना कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून सुद्धा सुनावलं होतं. ‘जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुरच्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील’, असं ट्विट करत निलेश राणेंनी खास आपल्या स्टाइलने शिवसेनेला सुनावले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!