🕒 1 min read
मुंबई : आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतील.
मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम
- स.९.३० वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण,
- स.१०.१५ वा. काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी.
- स. १०.१५ वा. काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण.
- स. ११.१५ वा. अपसिंगा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी.
- स. ११.३५ वा. अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
- दुपारी १२.२० वा. पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी राखीव.
- दु. १ ते १.४५ वाजेपर्यंत राखीव.
- दु. १. ४५ वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व ३.३० वा. सोलापूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण
महत्वाच्या बातम्या
- भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल
- सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
- उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !
- महाराष्ट्राला मदत करण्यास केंद्राचा दुजाभाव : राजू शेट्टी
- राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी- अनिल बोंडे

