🕒 1 min read
प्रफुल्ल पाटील (कावठेकर )- राजकारणी आणि त्यांचे काय किस्से असतील याचा विचार आपण न केलेलाच बरा. कधीकाळी दिल्लीत ‘महाराष्ट्र टाईम्स’ वृत्तपत्रकरिता पत्रकारिता केलेले दिवंगत पत्रकार अशोक जैन यांचे “राजधानीतून” हे पुस्तक म्हणजे या सगळ्या किस्स्यांचे भांडारच.
त्यांच्या या पुस्तकातील एक किस्सा खास आपल्या “महाराष्ट्र देशाच्या” वाचकांसाठी आम्ही सादर करतोय.उच्चस्तरीय चर्चा करण्यासाठी उंचावर म्हणजेच गोदरेज कपाटावर फोन ठेवणाऱ्या या मराठी खासदाराचा हा किस्सा.
सहाव्या,सातव्या,आठव्या आणि दहाव्या लोकसभेत अनुक्रमे धुळे आणि एरंडोल लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार “विजय नवल पाटील” म्हणजे एक भन्नाट व्यक्तिमत्व.विजू नानांचे तसे बरेच भन्नाट किस्से आहेतच पण हा अशोक जैन यांनी सांगितलेला किस्सा खूपच प्रसिद्ध आहे.
अशोक जैन म्हणतात की “ दिल्लीत अनेक मराठी नेत्यांना मी भेटत होतो.त्यात कायम लक्षात राहील असं व्यक्तिमत्व म्हणजे विजय नवल पाटील.बऱ्याच वेळेला सरळ होणारी काम घोळ घालून क्लिष्ट करणारे घोळघालू खासदार म्हणजे विजय नवल पाटीलअशी त्यांची ओळख आहे.
याच विजय नवल पाटील यांच्याकडे सहज एकदा कामानिमित्त गेलो असता त्यांनी त्यांना मिळालेला सरकारी फोन गोदरेज कपाटावर ठेवला होता. त्यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले की “मी उच्चस्तरीय चर्चा करण्यासाठी फोन उंचावर ठेवलाय.आता यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला सुचेना असं पुढे अशोक जैन नोंदवतात.
याच विजय नवल पाटील यांनी फक्त पक्षादेश आहे म्हणून चक्क दक्षिण काश्मीर मधून सुद्धा लोकसभा निवडणूक लढवली होती.त्याच बरोबर उत्तर महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचे काम देखील केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- लोकशाहीचा चौथास्तंभ कमजोर करण्याचे कारस्थान टीआरपी घोटाळ्यातून उघड
- #TRPSCAM : ‘आघाडी सरकारच्या अपयशावरून अन्यत्र लक्ष वळविण्यासाठी वाहिन्यांवर कारवाई’
- जाऊन घ्या भारतामध्ये कोविड बाधितांची संख्या खरच सातत्याने कमी होतेय का ?
- मालवाहतुक अभियान : रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात होतेय भरघोस वाढ
- ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
