Share

MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने परळीतील ठिय्या आंदोलन मागे

Published On: 

🕒 1 min read

बीड : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात विविध आंदोलनं मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे. तर, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्व प्रकारच्या भरती परीक्षा रद्द करण्यात यावा यासाठी खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजेंसह मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा देखील दिला होता.

दरम्यान, आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे अनेक मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी बीड मधील परळी येथे मराठा समाजातील युवकांनी ठिय्या आंदोलन पुकारलं होतं. काल संध्याकाळी एकूणच कोरोनाची परिस्थिती व मराठा समाजाचा वाढता विरोध बघता राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यानंतर मराठा समाजातील बांधवानी एकच जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले. खुद्द संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले होते. राज्य सरकारच्या निर्णयानंतर फटाके वाजवून परळीतील या युवकांनी आनंद व्यक्त केला व रात्री हे ठिय्या आंदोलन मागे घेतले. यावेळी युवकांनी मराठा समाजातील बाकी प्रश्नांचा देखील सरकारने गांभीर्याने विचार करून ते सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

पुढे काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच पुन्हा एकत्र बैठक घेऊन पुढील तारीख ठरवण्यात येईल व त्या तारखेला ही परीक्षा निश्चित घेण्यात येईलच असं सांगितलं असून जे ११ ऑक्टोबरला परीक्षा देण्यास पात्र होते ते सर्व विद्यार्थी पुढील तारखेच्या परीक्षेस पात्र राहतील असं देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!