Share

पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना कोरोनाची लागण!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच आता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही कोरोनाने प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याचा कारभार हाती घेतलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मनोज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही कोरोनाची तपासणी करून घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. सध्या मनोज पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अहमदनगरला रुजू झाल्यापासून कायम निष्क्रिय ठरलेले अहमदनगरचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची अवघ्या सहाच महिन्यात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगरला नियुक्ती झाली असून त्यांनी काही दिवसांपूर्वी आपला पदभार स्वीकारला होता. सोलापूर येथून बदली होऊन मनोज पाटील यांनी १ ऑक्टोबर रोजी नगर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला होता.

पदभार स्वीकारल्यानंतर पाटील यांच्या स्वागतासाठी अनेकांनी त्यांच्या भेटी घेतल्या. फोटोसेशनही झाले. जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राजकीय नेते, पदाधिकारी, पत्रकारांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले होते.

दोन दिवसांपासून मनोज पाटील यांना अशक्तपणा व कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. त्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अलीकडच्या काही दिवसांत जर कोणी माझ्या संपर्कात आले असेल तर त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!